ठाणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापनदिन आणि ज्येष्ठ साहित्यिक कै. डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतीदिन या निमित्ताने लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग यांच्या वतीने प्रतीवर्षी राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना ‘लोक हिंद गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येते.
यंदाचे या पुरस्काराचे ५ वे वर्ष असून कै. डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिदिनी १४ मे २०२२ या दिवशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, उद्योग, आरोग्य, कामगार, प्रशासन, सहकार आणि आध्यात्मिक संस्था यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या व्यक्ती यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. मानपत्र, सन्मानचिन्ह, तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव १५ मार्च २०२२ पर्यंत ‘संपादक, लोक हिंद चॅनेल, देशमुखवाडा, महाराष्ट्र बँकेच्या समोर, शहापूर जिल्हा ठाणे. पिन ४२१६०१’ या पत्यावर पोस्टाने, कुरियरने अथवा प्रत्यक्ष पाठवावे, असे आवाहन पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश धानके, उपाध्यक्ष लक्ष्मण घरत, तसेच जगदीश पताळे, जितेंद्र भानुशाली, रवींद्र जाधव, अंकुश भोईर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०४९०३७४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.