विद्यार्थ्यांना हिंसक आंदोलनासाठी प्रेरित केल्याचे प्रकरण
नागपूर – हिंसक आंदोलनासाठी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या प्रकरणी विकास पाठक उपाख्य हिंदुस्थानी भाऊ यांना शहर पोलिसांनी १८ फेब्रुवारी या दिवशी नोटीस बजावली आहे. त्यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी येथे चौकशीसाठी उपस्थित रहावे, असा आदेश पोलिसांनी दिला आहे. चौकशीच्या वेळी आवश्यकता भासल्यास येथील पोलीस त्यांना अटक करू शकतात. याच प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ यांना १७ फेब्रुवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. ‘विद्यार्थ्यांना हिंसक आंदोलन करण्यासाठी प्रेरित केले आहे’, अशा आरोपाखाली मुंबई पोलिसांनी विकास पाठक उपाख्य हिंदुस्थानी भाऊ यांना अटक केली होती. त्यांचे इन्स्टाग्रामवर १.४ दशलक्ष, तर फेसबूकवर १.१ दशलक्ष अनुयायी (फॉलोअर्स) आहेत.