(परात्पर गुरु) डॉ. आठवले : काही वेळा माझ्या अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे जाणवते किंवा कुणीतरी स्पर्श केल्यासारखे जाणवते; पण स्थुलातून तसे काहीच नसते. यामागील कारण काय ?
सप्तर्षी : परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतार आहेत. अवताराच्या अवतीभोवती सूक्ष्मातून सतत देवलोकातील देवता असतात. गुरुदेवांना ‘त्यांच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे जाणवणे’ म्हणजे ‘त्यांच्यावर देवलोकातून देवतांनी केलेले संप्रोक्षण होय !’ याआधीही असे घडत होते; मात्र आता त्यांना त्याची प्रत्यक्ष जाणीव होत आहे. स्वप्नात आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करतो; मात्र जागृतावस्थेत आल्यावर प्रत्यक्षात ती वस्तू नसते. त्याप्रमाणे वरील घटना आहे. ही घटना सूक्ष्मातून घडली आहे; मात्र स्थुलातून तसे काही दिसत नाही. आता अवताराची कीर्ती जगभर होण्याचा काळ जवळ आलेला असल्याने अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्याची जाणीव होत आहे. हीसुद्धा अवताराचीच लीला आहे !
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, २७.५.२०२१, सकाळी ८.४९)