हिजाब आणि भगवे उपरणे यांप्रमाणे वाद होण्याची शक्यता असल्याचे कारण दिले !
|
विजयपुरा (कर्नाटक) – येथील एका महाविद्यालयाने कपाळावर कुंकू लावून आलेल्या हिंदु विद्यार्थिनीला प्रवेश करण्यापासून रोखले आणि तिला कुंकू पुसण्यास सांगितले. राज्यात कुंकू लावून शाळा आणि महाविद्यालये येथे जाण्यास कोणतीही बंदी नसतांना आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी यावर कोणतीही मनाई केलेली नसतांना अशा प्रकारचा विरोध अयोग्य असल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटक में हिजाब के बाद अब नया विवाद #Karnataka | @nagarjund https://t.co/ojjIhBrNmT
— AajTak (@aajtak) February 18, 2022
या विद्यार्थिनीने सांगिले, ‘हिजाब घालून येणार्या मुलींना रोखण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे भगवे उपरणे घालून महाविद्यालयात येण्यास आरंभ केल्याने वाद निर्माण झाला, तसा वाद कुंकू लावून आल्यामुळे निर्माण होईल’, असे मला महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.’