पुणे येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या पुस्तक विक्रीच्या स्टॉलच्या उद्घाटनास पोलीस उपायुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित !

धर्मांध कट्टरतावादी संघटनेच्या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी उपस्थित असणे चिंताजनक !

  • ज्या संघटनेचा कट्टरतावादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये उघड सहभाग आहे, उत्तरप्रदेशसह काही राज्यांमध्ये जिच्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दंगल करण्याचा जिच्यावर आरोप आहे, अशा संघटनेला पुण्यासारख्या ठिकाणी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन करण्याची अनुमती मिळतेच कशी ? याची चौकशी सरकारने केली पाहिजे !
  • आतंकवादी संघटनेच्या पुस्तकांच्या प्रसार कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे पोलीस भविष्यात कधी तरी या संघटनेच्या आतंकवाद्यांना पकडतील का ? सरकारने अशा पोलिसांचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी काही लागेबांधे आहेत का हे तपासावे, अशी जनतेची मागणी आहे !

पुणे – येथील अश्रफनगर येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कोरोनाविषयक सामाजिक अंतराचे कोणतेही नियम न पाळता ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे कार्यकर्ते, तसेच मुसलमान नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कित्येकांनी मास्कही लावला नव्हता. (या संघटनेकडून कोणत्या प्रकारची पुस्तके विकली जातात आणि कसला प्रसार केला जातो, याचा पोलिसांनी अभ्यास केला आहे का ? – संपादक)