किराणा दुकान आणि मॉल येथे वाईन विक्रीविषयी घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी निवेदन !

तासगाव येथे तहसीलदारांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते

कोल्हापूर, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्र सरकारने किराणा मालाच्या दुकानांमध्ये, तसेच मॉलमध्ये वाईन विक्रीविषयी घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने देण्यात आली.

कोल्हापूर येथील निवासी नायब तहसीलदार लोकरे यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर आणि करवीर तालुका यांच्या वतीने एकत्रित निवेदने देण्यात आली. निवेदन देण्यापूर्वी सर्व धारकरी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित येऊन प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र यांचे पठण केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ह.भ.प. विठ्ठल पाटीलतात्या, कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, करवीर तालुकाकार्यवाह श्री. अनिकेत पाटील, विभागप्रमुख श्री. रोहित अतिग्रे, सौ. प्रतीक्षा अतिग्रे, यांच्यासह अन्य धारकरी उपस्थित होते.

१. गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील तहसील कार्यालयात निवेदन देतांना सर्वश्री सुधीर (आप्पा) शिवणे, राहुल तुकाराम शिंदे, ज्ञानदेव रामचंद्र शिंदे, राजू दत्तात्रय मोरे, मनोज दिनकर पोवार, राजेंद्र रामचंद्र शेटके यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.

२. पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) येथील तहसील कार्यालयात निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पन्हाळा विभागप्रमुख श्री. रोहित पाटील, यांसह सर्वश्री प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, स्वरूप मेडसिंग, सौरभ निंबाळकर, विराज कासार, सुदेश जगदाळे, योगेश पाटील, रौनक पाटील आदी धारकरी उपस्थित होते.

३. तासगाव (जिल्हा सांगली) येथील तहसील कार्यालयात निवेदन देतांना सर्वश्री गुंडुराव पाटील, सिद्धेश्वर लांब, सुहास बाबर, आदर्श जाधव, अमोल जाधव, संदीप माळी, युवराज पाटील, भागेश जाधव यांच्यासह अन्य धारकरी उपस्थित होते.