परळी (जिल्हा बीड) येथे गुटखा माफिया अल्ताफ पठाण, फिरोज शेख, गफार खान यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

गुटखा माफियांवर गुन्हा नोंद होण्यासह त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक 

परळी (जिल्हा बीड) – येथे साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुटखा माफिया अल्ताफ पठाण, गफार खान, फिरोज शेख, जयंत लोकरे आणि आनंद फले अशा ५ जणांच्या विरोधात परळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील जयंत लोकरे आणि आनंद फले या २ आरोपींना पोलिसांनी कह्यात घेतले आहे, तर अल्ताफ पठाण, फिरोज शेख आणि गफार खान हे ३ आरोपी पसार झाले आहेत.

पसार झालेले ३ आरोपी शहर, तालुका आणि जिल्हा स्तरावर गुटखा पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. (गुटखाबंदी असतांना गुटखा माफियांवर कुणाच्या वरदहस्तामुळे कारवाई करण्यात येत नाही, याचा शोध घेणे आवश्यक आहे ! – संपादक)