महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य विभागात शिकणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिने केलेल्या भरतनाट्यम् नृत्याच्या प्रयोगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

नृत्यसाधनेविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

कु. वेदिका मोदी

‘६.२.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य विभागात शिकणारी जोधपूर (राजस्थान) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिच्या भरतनाट्यम् नृत्याचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांसाठी घेण्यात आले. या प्रयोगांचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम पुढीलप्रमाणे आहे.

१. ‘अलारिपू’ या भरतनाट्यम् नृत्यप्रकाराची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

कु. म्रिणालिनी देवघरे

कु. वेदिकाने ‘अलारिपू’ (देवतांचे आवाहन करण्यासाठीचा नृत्यप्रकार) हा भरतनाट्यम्चा नृत्यप्रकार सादर केला. भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यशैलीत विशिष्ट क्रमाने नृत्यप्रकारांचे प्रस्तुतीकरण करण्याची पद्धत (मार्गम) आहे. या क्रमानुसार ‘अलारिपू’ हा प्रकार नृत्याच्या आरंभी आणि देवतांचे आवाहन करण्यासाठी केला जातो. ‘अलारिपू’ हा शब्द ‘अलारू्’ या तमिळ शब्दापासून आला असून त्याचा अर्थ आहे ‘उमलणे’. ज्याप्रमाणे फुलाची कळी उमलत जाते, त्याप्रमाणेच या नृत्यरचनेद्वारे नृत्यांगनेचे डोळे, भुवया, मान, खांदे, हात आणि पाय यांच्या हळूवार मोहक हालचालीतून तिचे नृत्य फुलत जाते. अलारिपूचा आरंभ डोक्यापासून होऊन पदन्यासाने त्याची सांगता होते. यात नर्तकी प्रथम ईश्वर, नंतर गुरु आणि विद्वान यांना वंदन करते. हा नृत्यप्रकार सादर केल्याने नृत्यांगनेला पुढील नृत्यरचना सादर करण्यासाठी शारीरिक चपळता मिळते. यात ‘तत् तै’, ‘तैयुम्’, ‘ताम्’ या बोलांची रचना असते.

– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, रामनाथी, गोवा.

भरतनाट्यम् मधील एक मुद्रा करतांना कु. वेदिका मोदी

२. कु. वेदिकाने परिधान केलेल्या भरतनाट्यम् नृत्याचा पोषाख, अलंकार आणि केशरचना यांचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम

तात्पर्य : ‘भरतनाट्यम्प्रमाणे सात्त्विक नृत्य सादर करत असतांना पोशाख, अलंकार आणि केशरचना हे सर्वकाही सात्त्विक असणे किती आवश्यक असते’, हे यावरून आपल्या लक्षात येते.

३. नर्तक किंवा नर्तकी यांनी नृत्याच्या आरंभी नमस्कार केल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ

नृत्याच्या आरंभी वेदिकाने भरतनाट्यम् नत्यप्रकारानुसार नमस्कार केला. तेव्हा तिने भूमीला नमस्कार केल्यावर भूदेवीने तिला आशीर्वाद दिला. या आशीर्वादामुळे तिला नृत्य करण्यासाठी भूदेवीचे चैतन्य मिळाले. त्यामुळे या नृत्यामध्ये भूमीवर पाय आपटल्यामुळे भूदेवीचा अपमान होत नाही आणि नृत्यातून भूदेवीची उपासना होते. त्यामुळे भारतीय शास्त्रीय नृत्याच्या आरंभी भूमीला, गुरूंना आणि देवतेला नमस्कार करण्याची पद्धत किती योग्य आहे’, हे यातून शिकायला मिळते.

४. कु. वेदिकाने नृत्याला आरंभ केल्यावर तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाचा एक प्रकाशाचा झोत येऊन तिच्यामध्ये देवीचे ३ टक्के इतके तत्त्व जागृत होणे आणि तिच्याकडून तारक शक्ती, भाव अन् आनंद यांच्या लहरींचे प्रक्षेपण होणे

वेदिकाने नृत्याला आरंभ केल्यावर तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाचा एक प्रकाशाचा झोत आला. या प्रकाशाच्या झोतातून देवीचे ३ टक्के इतके तत्त्व कु. वेदिकाकडे आकृष्ट झाले आणि ते तिच्या नृत्यातून वातावरणात प्रक्षेपित झाले. तेव्हा कु. वेदिकाकडून तारक शक्ती, भाव आणि आनंद यांच्या लहरींचे प्रक्षेपण झाले. त्या वेळी कार्यक्रमस्थळी उच्च स्वर्गलोकाचे वायूमंडल ३० टक्के आणि महर्लाेकाचे वायूमंडल १० टक्के इतके निर्माण झाले. त्यामुळे तिचे नृत्य पहात असतांना दिव्यत्वाची अनुभूती आली.

५. कु. वेदिकाने देवतांचे आवाहन करणारे नृत्य अत्यंत भावपूर्णरित्या केल्यामुळे या नृत्यामुळे दैवी शक्तींचे आगमन कार्यक्रमस्थळी झाल्याने तिच्यावर ऋषिलोकातील ऋषींनी सूक्ष्मातून मोगर्‍याच्या कळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्या यांची वृष्टी करणे

कु. मधुरा भोसले

वेदिकाचे नृत्य पूर्ण झाल्यावर तिच्यावर ऋषिलोकातील ऋषींनी मोगर्‍याच्या कळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्या यांची वृष्टी केल्याचे दृश्य दिसले. तेव्हा सूक्ष्मातून चमेली आणि गुलाब यांचा सुगंध वातावरणात दरवळला. चमेलीच्या सुगंधातून देवीचे तत्त्व आणि गुलाबाच्या सुगंधातून विष्णुतत्त्व वातावरणात पसरले. गुलाबाच्या गंधामध्ये गोडवा आहे. या गोडव्यामध्ये विष्णुतत्त्व आकृष्ट करून ते गंधलहरींच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे गुलाबामध्ये विष्णुतत्त्व आहे. त्यामुळे श्रीविष्णूला तुळशीच्या हारानंतर गुलाबाचा हार घालणे प्रिय आहे. दक्षिण भारतात श्रीव्यंकटेश बालाजीला गुलाबाच्या फुलांचा मोठा हार अर्पण करण्याची पद्धत आहे.

कु. वेदिकाने देवतांचे आवाहन करणारे अत्यंत भावपूर्णरित्या नृत्य केल्यामुळे या नृत्यामुळे दैवीशक्तींचे आगमन कार्यक्रमस्थळी झाले. त्यामुळे कु. वेदिकामध्ये कार्यरत झालेल्या देवतांच्या तत्त्वांवर ऋषिलोकातील ऋषींनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.(हे सूक्ष्म परीक्षण केल्यावर मला नंतर समजले की, भरतनाट्यम्मधील ‘अलारिपु’ हा नृत्यप्रकार देवतांचे आवाहन करण्यासाठी केला जातो’. – कु. मधुरा)

६. नृत्यातील विविध घटकांतून प्रक्षेपित झालेल्या विविध प्रकारच्या लहरी

७. ‘अलारिपू’ हा नृत्यप्रकार सादर करतांना तिच्या देहातून निर्गुण चैतन्याच्या पांढर्‍या रंगाच्या लहरींचे प्रक्षेपण होणे

‘अलारिपू’ हा नृत्यप्रकार सादर करतांना तिच्या देहातून निर्गुण चैतन्याच्या पांढर्‍या रंगाच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन त्या लहरी तिच्याभोवती १० ते १५ फुटांपर्यंत पसरल्या. त्यामुळे वायूमंडलाची शुद्धी १० टक्के इतकी झाली.

८. ‘अलारिपू’ हा नृत्यप्रकार करत असतांना कु. वेदिकामधून प्रक्षेपित झालेल्या विविध घटकांचे प्रमाण (टक्के)

९. ‘अलारिपू’ हा नृत्यप्रकाराचा वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे साधक यांच्यावर झालेला परिणाम

१०. भक्ती, कर्म आणि ज्ञान या योगांनुसार साधना होणे

कु. वेदिकाने भक्तीयोगानुसार भावपूर्ण, कर्मयोगानुसार परिपूर्ण आणि नृत्यशास्त्रानुसार अचूक नृत्य केल्यामुळे तिच्याकडून झालेल्या नृत्योपासनेमुळे शिव अन् पार्वती तिच्यावर प्रसन्न झाल्याचे जाणवले. तेव्हा कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून शिव आणि पार्वती आल्याचे जाणवले. तेव्हा वातावरणात कापराचा दैवी सुगंध दरवळला.

११. कृतज्ञता

‘भोलेनाथ भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपेमुळे कु. वेदिका मोदी हिने केलेल्या भरतनाट्यम् नृत्याचा सूक्ष्म स्तरावर किती चांगला परिणाम होतो’, हे मला शिकायला मिळाले आणि माझ्या मनावर भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व बिंबले’, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे. नटराज शिव हे भारतीय शास्त्रीय नृत्याचे जनक आहेत आणि पार्वतीमाता ‘लास्य’ (मोहक आणि सुकोमल नृत्य) नृत्याची जनक आहे. त्यामुळे या नृत्याच्या प्रयोगाच्या संदर्भातील लिखाण त्यांच्या कृपेमुळे मला करता आले’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२२)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.