पूर्वीच्या गुरुकुल धर्तीवर सनातनचे साधक आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असणे अन् त्यांना प्रत्येक आठवड्याला भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून गुरूंचे अमूल्य मार्गदर्शन लाभणे
‘पूर्वी विद्यार्थ्यांना गुरुगृही राहून विद्याभ्यास करावा लागत असे आणि तेथील सर्व प्रकारच्या सेवाही कराव्या लागत असत. त्याच पद्धतीने परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांकडून सेवा आणि साधना करवून घेऊन आम्हाला शिकवत आहेत. एवढेच नव्हे, तर साधकांना आठवड्यातून एक दिवस दोन घंटे भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून त्यांच्या कृपेने अमूल्य असे मार्गदर्शन मिळत आहे. ‘आसमंतातील विशाल हिरवळीवर सर्व ठिकाणचे साधक सत्संगातून शिकण्यासाठी बसले आहेत’, असा आमचा भाव असतो.
साधक परात्पर गुरु डॉक्टरांना शंका विचारतात. तेव्हा ‘ते सूक्ष्मातून साधकांच्या शंकांचे निरसन करतात’, अशी अनुभूतीही आम्ही घेत असतो. मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. नंदकिशोर नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.५.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |