एखाद्या व्यक्तीला भावपूर्ण शुभेच्छा दिल्याने शुभेच्छा देणार्‍याला होणारे लाभ !

सौ. विद्या जाखोटिया

‘वाढदिवसाच्या दिवशी किंवा अन्य वेळी एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देतांना त्या मनापासून, ४ – ५ वाक्यांत आणि ‘खरेच त्या व्यक्तीचे भले आणि कल्याण व्हावे’, हा भाव ठेवून द्याव्यात. त्यामुळे पुष्कळ लाभ होतो.

१. अंतर्मनातून त्या व्यक्तीशी जवळीक निर्माण होते.

२. स्वत:मधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे परस्परांत दुरावा निर्माण झाला असल्यास तो नष्ट व्हायला साहाय्य होते.

३. आपण इतरांचे चांगले चिंतल्यावर आपल्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि प्रीती निर्माण होते.

४. स्वत:च्या मनात त्या व्यक्तीविषयी काही पूर्वग्रह असल्यास ते इतर अधिक प्रयत्न न करता निघून जातात.

५. समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी जवळीक वाटल्याने त्या व्यक्तीला आपला आधार वाटतो आणि ती व्यक्ती आपल्याशी मनमोकळेपणाने बोलते.

६. यामुळे पुढच्या टप्प्याचे नवीन नाते निर्माण होते. एरव्ही ज्यांच्याशी आपला फारसा संपर्क नसतो, त्यांना शुभेच्छा दिल्यावर त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होते.

आपण केवळ ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !’ असे न सांगता प्रत्येकाला म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी, साधक, हितचिंतक, जिज्ञासू, धर्मप्रेमी इत्यादींना वेगवेगळे भावपूर्ण संदेश पाठवू शकतो. एखाद्या व्यक्तीशी ‘काय बोलायचे आहे ?’, याचे चिंतन करून आणि मनात प्रेमभाव ठेवून आपण त्या व्यक्तीला भावपूर्ण शुभेच्छा देऊ शकतो.’

– सौ. विद्या जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), पुणे (६.४.२०२१)