ख्रिस्ती धर्म न स्वीकारणार्‍या विद्यार्थिनीला ख्रिस्ती आत्महत्येला प्रवृत्त करायला धजावतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंच्या संघटनांचा विरोध इतका परिणामकारक असला पाहिजे की, असे करायला कुणी धजावणार नाही !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘तमिळनाडू अरियालूर जिल्ह्यातील वडुगापलायम् गावात रहाणारी एम्. लावण्या ही थिरुकट्टुपली सेक्रेड हार्ट हायस्कूलमध्ये १२ वीत शिकत होती. तिला शाळेकडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात येत असल्याने तिने त्याला नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या शाळेच्या प्रशासनाने पोंगल (मकरसंक्रांतीच्या) सणाच्या सुटीत तिला घरी पाठवण्यास नकार दिला. त्याऐवजी तिला वसतीगृहात रहाण्यास भाग पाडले आणि शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ करणे, भांडी धुणे अन् स्वयंपाक करणे यांसारखी कामे करायला लावली. या कारणाने हताश झालेल्या लावण्याने बागेत वापरण्यात येणारे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. विश्व हिंदु परिषद, हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) आणि इतर हिंदू संघटना मुलीच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.’