जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक पुणे पोलिसांपुढे चौकशीसाठी उपस्थित

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरण

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपव्यवहार केल्याप्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअर आस्थापनाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन् हे ८ फेब्रुवारी या दिवशी पुणे पोलिसांपुढे उपस्थित झाले. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी बेंगळुरू येथील न्यायालयाकडून अटकेपासून २५ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण मिळवले आहे. या प्रकरणी संचालक अश्विनकुमार यांच्याकडे केलेल्या अन्वेषणात आस्थापनाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन् यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्यांना या गुन्ह्यात अन्वेषणाच्या वेळी उपस्थित रहाण्यासाठी ई-मेलवर नोटीस बजावण्यात आली होती; मात्र त्या वेळी त्यांनी सायबर पोलिसांना काहीही उत्तर दिले नव्हते.