१० फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘दासबोध जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘समाजाला अनंत काळापर्यंत मार्गदर्शक ठरतील’, असे अनेक ग्रंथ आणि रचना यांची समर्थ रामदासस्वामींनी निर्मिती केली. त्यात ‘दासबोध’ हा ग्रंथ आणि ‘मनाचे श्लोक’ ही रचना महत्त्वाची आहे. या दोन्ही रचनांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरलेली वर्णनशैली. यांत बुद्धी आणि ज्ञान यांचा अत्यंत सुंदर मेळ आहे. ‘सर्वसामान्यांच्या जीवनातील घटनांची साधी आणि सोपी उदाहरणे देऊन सर्वसामान्यांना अध्यात्म जगता येईल’, असे मार्गदर्शन यांत केले आहे.’
– सौ. आनंदी पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल (वर्ष २००९)