या दोषींना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सरकारने केली पाहिजे ! – संपादक
कर्णावती (गुजरात) – येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने ७७ पैकी ४९ जणांना दोषी ठरवले आहे, तर २८ जणांची निर्दोष सुटका केली आहे. शहरातील २० ठिकाणी झालेल्या २१ बाँबस्फोटांच्या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी एकूण १ सहस्र ११७ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २४६ जण गंभीररित्या घायाळ झाले होते.
A special court in Gujarat on Tuesday convicted 49 accused in the case of Ahmedabad serial blasts in 2008 in which 56 people were killed and over 200 suffered injuries.https://t.co/AdCqdnXBWi
— Swarajya (@SwarajyaMag) February 8, 2022