वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील बनारस हिंदु विश्वविद्यालयाकडून गोवर्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विश्वविद्यालयातील सामाजिक संकाय (शाखा) विभागाच्या अंतर्गत येणार्या समन्वित ग्रामीण विकास केंद्रातील प्राध्यापक कौशल किशोर मिश्रा यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतून याचा व्हिडिओही प्रसारित होत आहे.
१. विश्वविद्यालयाकडून याविषयी एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रा. कौशल मिश्रा यांच्याकडून देण्यात येणार्या गोवर्या बनवण्याच्या प्रशिक्षणामध्ये गायीच्या शेणाचा वापर करण्यात येत आहे. या गोवर्यांचा उपयोग हवन, पूजन आणि स्वयंपाकघरांमध्ये केला जाऊ शकतो.
२. या केंद्राकडून केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे की, शेतकर्यांना भारतीय वंशाच्या गायींचे पालन करण्यासाठी आणि त्याआधारित उत्पादनांसाठी आर्थिक साहाय्य करण्यात यावे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.