‘हलाल जिहाद’च्या विरोधात पुणे येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलेकडून मोठ्या मॉलमध्ये प्रबोधन !

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या सौ. सायली रिंगणे यांचे अभिनंदन !

पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला सौ. सायली रिंगणे या डिसेंबर २०२१ पासून जोडल्या गेल्या आहेत. धर्मशिक्षणवर्गामध्ये ‘हलाल’ प्रमाणित वस्तू न वापरण्याविषयी सांगण्यात आले होते. त्यानंतर एकदा सौ. रिंगणे त्यांच्या यजमानांसमवेत शहरातील एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. यजमान हलाल प्रमाणित ‘हिमालया’ या आस्थापनाच्या वस्तू घेत होते. सौ. रिंगणे यांनी त्यांना तेथेच थांबवून सांगितले, ‘‘या वस्तू ‘हलाल’ प्रमाणित आहेत. त्यामुळे आपण त्या विकत घ्यायच्या नाहीत.’’ या वेळी त्यांनी इतरांचेही प्रबोधन केले.

सौ. सायली रिंगणे आणि सौ. सुनीता सरगर

१. यासंदर्भात सौ. रिंगणे म्हणाल्या, ‘‘धर्मशिक्षणवर्गात ‘हलाल’ हा विषय सांगितल्याने आम्ही हलालची उत्पादने घेत नाही.’’

२. धर्मशिक्षणवर्गातील सौ. सुनीता सरगर यांनीही हलाल प्रमाणित ‘आशीर्वाद’ आस्थापनाचा आटा विकत घेण्याचे पूर्णपणे बंद केले. (या धर्माभिमानी महिलांचा आदर्श इतरांनीही घ्यावा ! – संपादक)