नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. याआधी ही परीक्षा १२ मार्चला होणार होती. आता ती मे किंवा जून मासामध्ये होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे मे-जून २०२२ मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
NEET PG 2022: Union Health Ministry postpones March 12 exam by 6-8 weeks https://t.co/inT4gjwHh4
— Republic (@republic) February 4, 2022
‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.