|
पुणे – येथे स्वाती शेळके या हिंदु मुलीचा अरिफ काझी या मुसलमान मुलाशी ‘शिवविवाह’ म्हणून विवाह लावून देण्यात आला. (संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्म स्थापन केला आहे आणि ‘शिवविवाह’ ही पद्धत निर्माण केली आहे.) शिवविवाह हा हिंदु धर्मातील पारंपरिक विवाहाला फाटा देऊन भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेवून केला जातो. पुणे येथे झालेल्या या विवाहाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.
सत्तेत येताच @NCPspeaks आपला मुख्य अजेंडा तर राबवत नाही ना?
आधी शिवधर्म आणला होता आणि आता लव जिहाद चे भीषण सत्य "शिवविवाह" या गोड नावाने लोकांच्या गळी उतरवत आहेत का?
हा शिवरायांचा अपमान आहे!@SG_HJS @Ramesh_hjs @bhideguruji @PrasadVKathe @BajrangDal_IND
https://t.co/Y2RvCWSkXZ— 𝐌𝐢𝐥𝐢𝐧𝐝 𝐃𝐡𝐚𝐫𝐦𝐚𝐝𝐡𝐢𝐤𝐚𝐫𝐢 © (@Milind_MMD) January 28, 2022
(मुसलमान मुलाशी लग्न करतांना हिंदु मुलीला तिचा धर्म पालटावा लागतो किंवा नंतर तिला बळजोरीने धर्मपरिवर्तन करणे भाग पाडले जाते. बर्याचदा विवाहानंतर तिला बुरखा घालणे, गोमांसभक्षण करणे, कुराण वाचणे हेही बलपूर्वक करणे भाग पाडले जाते. अशी अनेक उदाहरणे असतांना अशा प्रकारे एका हिंदु मुलीला मुसलमान मुलाशी विवाह करून देतांना त्याचे शिवविवाह म्हणून समर्थन करणे कितपत योग्य ? – संपादक)
Hindu Janajagruti Samiti said Calling 'Love Jihad' 'Shiva marriage' is an insult to Chhatrapati Shivaji Maharaj https://t.co/cIt3MxFeMV
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) January 28, 2022
‘लव्ह जिहाद’ला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमानच ! – हिंदु जनजागृती समिती
महिला आयोग राज्यातील २५ सहस्र गायब मुलींना कधी शोधणार ?
मुंबई – भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतीने स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे; मात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केला, तिचे धर्मांतर केले नाही; परंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी बलपूर्वक मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडली. आज ‘लव्ह जिहाद’चे भयंकर षड्यंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदु युवतींना पुढे बलपूर्वक इस्लाम ‘कबूल’ (मान्य) करण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतात. तसेच अनेक जणींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत.
राजकीय पोळी भाजण्यासाठी लव्ह जिहाद'च्या षड्यंत्राला 'शिवविवाह' म्हणणे हा छत्रपती शिवरायांचा अपमानच!!
आधी महाराष्ट्रात 25 हजार मुली आणि महिला गायब झाला आहेत त्याकडे महिला आयोगाने लक्ष द्यावे !!अशा ब्रिगेडी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो!!@Ramesh_hjs @sanatandeep_ @abpmajhatv pic.twitter.com/EVzmkv3LLk
— Sunil Ghanwat (@SG_HJS) January 28, 2022
उद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती ‘हिंदु’ असतील कि ‘मुसलमान’ ? अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता केवळ प्रसिद्धीसाठी या विवाहाला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. तसेच ‘शिवविवाहाच्या नावे धर्मद्रोहाची राजकीय पोळी भाजणार्या ब्रिगेडी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो’, असेही समितीने पुढे म्हटले आहे.
समितीने पुढे म्हटले आहे की,
१. पूर्वी समाजवादी चळवळीतील नेतेही त्यांच्या कार्यकर्त्या असणार्या हिंदु मुलींचा विवाह मुसलमान युवकांसमवेत लावून प्रसिद्धी मिळवत असत; मात्र स्वतःच्या मुलींसाठी कोकणस्थ, देशस्थ असे भेद पाहून मुलगा शोधत असत.
२. या समानतेच्या चळवळीत छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवणार्यांनी स्वतःच्या मुलींसाठी असा विवाह ठरवल्यास खरेतर ‘स्वतः केले आणि मग सांगितले’, असा आदर्श घालून देता येईल.
३. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपाली चाकणकर या अशा विवाहाचे समर्थन करत आहेत, हे दुर्दैवी आहे. एखाद्या आयेशा, रुक्साना हिचा विवाह एखाद्या हिंदु मुलाशी लावून त्या समारंभात चाकणकर यांनी जाऊन उभयतांना आशीर्वाद द्यावेत, मग त्यांची धर्मनिरपेक्षता खरी असल्याचे म्हणता येईल.
४. खरेतर महाराष्ट्रात आज २५ सहस्र मुली आणि महिला गायब असण्याची धक्कादायक स्थिती असतांना महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा शिवविवाहामध्ये सहभागी होत आहेत, हे दुर्दैवी आहे.