‘२२.७.२०१८ या दिवशी मला नोकरीच्या एका परीक्षेसाठी भाग्यनगरपासून ४० कि.मी. दूर जायचे होते. परीक्षा केंद्राच्या बाजूलाच भाग्यनगर सेवाकेंद्र आहे. त्यामुळे सकाळी जातांना मनात विचार आला, ‘सेवाकेंद्रात जाऊन काही ‘पार्सल’ न्यायचे आहे का ?’, असे विचारून जावे. त्याप्रमाणे मी सेवाकेंद्रातून पार्सल घेऊन निघालो. ‘परीक्षेला जायला विलंब होईल’, असे वाटत होते; परंतु मार्गात येणारे सर्व ‘ट्रॅफिक सिग्नल’ त्यांच्या जवळ गेल्यावर चालू होत होते. त्यामुळे मी परीक्षेला वेळेवर पोचलो. मी आश्रमजीवन अनुभवल्यानंतर प्रथमच नोकरीच्या मुलाखतीसाठी (‘इंटरव्यू’ला) जात होतो. तेव्हा मला असा अनुभव आला की, माझा या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने काहीच अभ्यास झाला नव्हता, तरी मुलाखत सहजगत्या झाली.’
– श्री. प्रसन्ना वेंकटापुर, भाग्यनगर, आंध्रप्रदेश. (२२.७.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |