भारताचे प्राचीन प्रजासत्ताक

 

गणतंत्र ही संकल्पना वेदांमधील आहे. महाभारताच्या सभापर्वात अर्जुन अनेक गणराज्ये जिंकतो, असा उल्लेख आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी तो ही गणराज्ये जिंकतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात काही गणराज्यांचा नावासह उल्लेख आहे. लिचवी, कंम्बोज ही काही गणराज्यांची नावे आहेत. पाश्चात्त्य मेगास्थेनिस याने भारताचे जे वर्णन केले आहे, त्यात तो सांगतो ‘दोन गणराज्यांमध्ये मी प्रवास केला आहे.’ त्याने प्रवास केलेल्या गणराज्यांपैकी एक आहे मालव आणि दुसरे शिबी. त्यामुळे गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.