जगाला गणितशास्त्राची देणगी देणारे प्राचीन भारतीय गणिती !

भारत हा गणितशास्त्राला जन्म देणारा देश आहे, असे संपूर्ण जग मानते. याचा पुरावा म्हणजे ‘कोडेक्स व्हिजिलन्स’ हा युरोपमधील सर्वांत जुना ‘गणित’ विषयावरील ग्रंथ ! सध्या हा ग्रंथ स्पेनची राजधानी असलेल्या माद्रीद येथील संग्रहालयात ठेवला आहे. या ग्रंथात लिहिले आहे, ‘गणनेसाठी वापरात असलेल्या चिन्हांवरून (अंकांवरून) असे जाणवते की, प्राचीन हिंदूंची बुद्धीमत्ता अत्यंत तीक्ष्ण होती आणि इतर देश हे गणना अन् भूमिती, तसेच इतर विज्ञान शाखांमध्ये तुलनेने पुष्कळ मागासलेले होते.’

(संदर्भग्रंथ : भारताची उज्ज्वल विज्ञान-परंपरा. लेखक : सुरेश सोनी)

भारताचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी www. BalSanskar.com या संकेतस्थळाला भेट द्या !