पाचल (राजापूर) परिसरात अभियानाला प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातनचे‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’

पाचल, २३ जानेवारी (वार्ताहर) – आगामी आपत्काळात, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असणारी ‘सनातन संस्था’ प्रकाशित ग्रंथसंपदा घरोघरी पोचवण्याच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला पाचल आणि परिसरातील प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डावीकडून श्री. श्रीकृष्ण नारकर, स.वि. मंदिर, पाचलचे मुख्याध्यापक श्री. सिद्धार्थ जाधव यांच्याकडे ग्रंथ सुपुर्द करतांना ‘पितांबरी’चे प्रतिनिधी श्री. प्रदीप प्रभुदेसाई आणि श्री. संदीप पुरोहित

या अभियानात काही दात्यांनी माध्यमिक शाळांसाठी लघुग्रंथ प्रायोजित केले. यांमध्ये सुप्रसिद्ध पितांबरी उद्योगाचे कार्यकारी संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ताम्हाणे आणि पाचल येथील माध्यमिक शाळांसाठी ‘टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा!’ या लघुग्रंथांच्या १,२९० प्रती प्रायोजित केल्या. याच लघुग्रंथाच्या ८० प्रती श्री. महेश गांगण यांनी रायपाटण येथील माध्यमिक शाळेसाठी, तर १२० प्रती श्री. सुरेश ऐनारकर यांनी कारवली येथील माध्यमिक शाळेसाठी प्रायोजित केल्या.

काही दात्यांनी वाचनालयांसाठी ग्रंथ आणि लघुग्रंथ प्रायोजित केले. यांमध्ये श्री. प्रकाश सावंत यांनी परुळे येथील वाचनालयासाठी १० ग्रंथ, श्री. संदीप बारस्कर यांनी तळवडे येथील वाचनालयासाठी ५१ ग्रंथ आणि १४ लघुग्रंथ, अधिवक्ता चंद्रकांत कडू यांनी ताम्हाणे येथील वाचनालयासाठी २१ ग्रंथ प्रायोजित केले. या अभियानात अनेक जिज्ञासूंनी स्वतःसाठी मोठ्या संख्येने ग्रंथ खरेदी केले.