इस्लामी आतंकवाद्यांच्या नरसंहारमुळे काश्मिरी हिंदूंना पलायन केल्याच्या दिवसाची भीषणता आजही आठवते ! – अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन

जे अमेरिकेतील एका अभिनेत्री आणि गायिकेला वाटते, ते भारतातील अभिनेते, गायक, खेळाडू यांना का वाटत नाही ? गेल्या ३२ वर्षांत त्यांनी याविषयी कधी तोंड का उघडले नाही ? अशांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैध मार्गने जाब विचारला, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक

अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन

न्यूयॉर्क (अमेरिका) – जगभर धार्मिक छळ चालू आहे. आज आपल्याला ‘पलायन दिवसा’ची भीषणता आठवते. तेव्हा काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील इस्लामी आतंकवाद्यांच्या नरसंहारामुळे पळून जावे लागले होते. माझ्या प्रार्थना काश्मिरी हिंदूंसमवेत आहेत; कारण अजूनही अनेक लोक त्यांच्या प्रिय लोकांसाठी, तसेच त्यांच्या घरांसाठी शोक करत आहेत, अशा शब्दांत अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी काश्मिरी हिंदूंच्या विस्थापन दिनानिमित्त ट्वीट करून संवेदना व्यक्त केल्या. भारताचे राष्ट्रगीत आणि ‘ओम जय जगदीश हरे’ हे भक्तीगीत गायल्यानंतर मिलबेन भारतात आणि भारतीय अमेरिकी लोकांमध्ये पुष्कळ लोकप्रिय झाल्या आहेत.

मिलबेन यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, एक जागतिक व्यक्तीमत्व म्हणून मी नेहमीच काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देईन; कारण धार्मिक स्वातंत्र्य आणि जागतिक धोरण हे कोणत्याही धर्माचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. ख्रिस्त्यांचा छळ, सेमेटिझम्, (जातीय गट आणि त्यांचा धर्म या दोन्ही गोष्टींमुळे ज्यू लोकांमध्ये भेदभाव करणारा पूर्वग्रह) ज्यूंचा द्वेष, हिंदू आणि इतरांविरुद्धचा नरसंहार आजही चालू आहे. मी अमेरिकी आणि जागतिक नागरिक यांना या वाईट गोष्टींविषयी उदासीन राहू नये, असे आवाहन करते.