मध्यप्रदेश पोलिसांचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक खात्यामध्ये स्थानिक भाषेचा, तसेच हिंदी भाषेचा वापर केला गेला पाहिजे ! मोगल आणि इंग्रज यांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला असला, तरी भाषिक गुलामगिरी अद्याप कायम असल्याने त्याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येक ठिकाणी शुद्ध भाषांचा वापर करण्यात येईल ! – संपादक
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील पोलिसांकडून उर्दू, फारसी आदी भाषांतील अहिंदी शब्दांचा होणारा वापर टाळण्याचा प्रयत्न चालू करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गेल्या मासामध्ये याविषयी पोलिसांना आदेश दिला होता.
१. मध्यप्रदेशच्या पोलीस मुख्यालयाने एक पत्रक काढून राज्यातील सर्व जिल्हा पोलीस अधिकार्यांना अहिंदी शब्दांना पर्यायी हिंदी शब्दांचा वापर करण्याविषयी येत्या ७ दिवसांत सुधारणा कळवण्याचा आदेश दिला आहे.
२. यात म्हटले आहे की, पोलिसांसाठी हिंदी शब्दकोश बनवण्यात येत आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात अन्य भाषांतील शब्दांना हिंदीमध्ये पर्यायी शब्द उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या शब्दकोशाद्वारे २०० हून अधिक अहिंदी शब्दांना पर्यायी शब्द निर्माण करण्यात येणार आहेत. या शब्दांचा पोलिसांच्या कामकाजात नियमित वापर करण्यात येणार आहे. उदा. ‘हलफनामा’च्या ऐवजी ‘शपथपत्र’ अशा पर्यायी शब्दांचा वापर करण्यात येणार आहे.