असंवेदनशीलतेची परिसीमा !
सातारा, १९ जानेवारी (वार्ता.) – ‘मला न विचारता मजूर दुसर्या ठिकाणी का नेले ?’ या कारणावरून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप-ठोंबरे आणि त्यांचे पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिला वनरक्षक सिंधू सानप-ठोंबरे या ३ मासांच्या गर्भवती आहेत. मारहाणीमुळे रक्तस्राव झाला. जानकर पती-पत्नीविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे.