फेसबूकचा उपयोग तिथीने वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो !

आज अनेक हिंदू तिथीनुसार वाढदिवस साजरा करू लागले आहेत; मात्र यात अडचण अशी होते की, अजूनही अभिष्टचिंतनाचे दूरभाष संबंधितांना त्यांचा इंग्रजी दिनांकानुसार असलेल्या वाढदिवसाच्या दिवशीच येतात. याचे प्रमुख कारण म्हणजे आज फेसबूक हे लोकांना वाढदिवसाची आठवण करून देणारे साधन बनले आहे. हे लक्षात घेऊन आपण फेसबूक याच साधनाचा उपयोग तिथीने वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो. आपण सगळेच आपल्या पुढच्या वर्षीची वाढदिवसाची तिथी कोणत्या दिनांकाला आहे, ते पाहून तो दिनांक आपला जन्मदिनांक म्हणून फेसबूकवर पालटू शकतो. असे केल्यास संबंधित शुभेच्छा त्याच दिवशी देतील. प्रतिवर्षी आपला दिनांक तिथीप्रमाणे पालटायचा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.’ – श्री. निनाद ओक, मालाड, मुंबई.