श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

समाधी घेणे

‘व्यष्टी उपासना करून संतपदी विराजमान झालेल्या समाजातील एका संतांच्या मनात विचार येत होता, ‘आता मी समाधी घ्यायला हवी.’ याविषयीचा योग्य दृष्टीकोन पुढीलप्रमाणे आहे, ‘समाधी घ्यायला हवी’, असे वाटणे हीपण स्वेच्छाच आहे. जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.

त्याच्यावर देह सोडून निश्चिंत रहावे. त्याला जेव्हा वाटेल, तेव्हा तो आपल्याला मरण देईल. त्या वेळी ते मरणही समाधी समानच होते.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)