चित्तग्राम (बांगलादेश) येथे सरस्वतीपूजेसाठी बनवण्यात आलेल्या देवीच्या ३५ मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड

जगभरात हिंदूंच्या देवतांची विविध प्रकारे होणारी विटंबना रोखली जावी, यासाठी  भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे, हाच एकमेव पर्याय ! – संपादक

देवीच्या मूर्तींचे शीर आणि हात यांची तोडफोड करण्यात आली आहे

चित्तग्राम (बांगलादेश) – वसंतपंचमीच्या दिवशी भारतासह अन्य देशांमध्येही सरस्वतीदेवीची पूजा केली जाते. बांगलादेशातील चित्तग्राम येथे सरस्वतीदेवी पूजनासाठी बनवण्यात आलेल्या देवीच्या ३५ मूर्तींची अज्ञातांनी रात्रीच्या वेळी तोडफोड केल्याची घटना घडली.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)

स्थानिक मूर्तीकार बासू देव यांनी मूर्तीशाळेत या मूर्ती ठेवलेल्या होत्या. देवीच्या मूर्तीचे शीर आणि हात यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी ‘या कृत्याला वैयक्तिक शत्रूत्व किंवा धार्मिक कारण असू शकते’, असे म्हटले आहे; परंतु बासू देव यांनी त्यांचे कुणाशीही वैयक्तिक स्तरावर शत्रूत्व नसल्याचे सांगितले. बासू देव आणि त्यांचे वडील हरिपाद पाल यांनी म्हटले आहे की, आम्ही येथे अनेक वर्षे काम करत आहोत, तरी आतापर्यंत अशी घटना कधीही घडलेली नाही. या प्रकरणी आम्हाला न्याय हवा आहे.