मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे. आरक्षण रहित होत नसेल, तर या देशाची राज्यघटना पालटावी आरक्षणामुळे गुणवत्तेला न्यून लेखले जात आहे, गुणवत्तेला समान संधी दिली, तर या देशाचा विकास होईल; अन्यथा गुणवत्तेऐवजी जातीला प्राधान्य दिले, तर या देशाचा सत्यानाश झाल्याविना रहाणार नाही. गुणवत्तेला डावलून आरक्षणला प्राधान्य दिल्यामुळे असे अनेक युवक आत्महत्येला प्रवृत्त होतील, त्यामुळे आरक्षण रहित झालेच पाहिजे, असे मत श्री. अजयसिंह सेंगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रदर्शित केले आहे.