१. मितभाषी
‘रामदास पुष्कळ शांत आणि अबोल आहे. तो कुठल्याही अनावश्यक विषयावर बोलत नाही.
२. प्रेमभाव
रामदासची आश्रमातील सर्व साधकांशी जवळीक आहे. मी त्याला कधीही कुणाशी चिडून किंवा रागाने बोलतांना पाहिले नाही. त्याच्या कुटुंबियांनी घरून काही खाऊ पाठवल्यास तो सर्वांना देतो.
३. ‘इतरांची मने दुखावतील किंवा त्यांना त्रास होईल’, असे तो कधीही वागत नाही.
४. त्याची सेवा विजेशी (‘इलेक्ट्रिसिटी’शी) संबंधित असल्याने साधकांनी रात्री-अपरात्री कधीही भ्रमणभाष करून अडचण सांगितल्यास तो कुठलेही कारण न सांगता साधकांच्या साहाय्याला लगेच जातो.
५. शिकण्याची वृत्ती
आश्रमात आल्यावर अनुभव नसतांनाही त्याने विजेशी संबंधित सेवा लगेच शिकून घेतली. तो स्वतः दायित्व घेऊन ती सेवा करण्याचा प्रयत्न करू लागला.
६. सेवेची तळमळ
रामदासला सेवा करतांना वेळेचे भान नसते. बर्याच वेळा त्याला सेवेतील बारकावे ठाऊक नसतात. त्यामुळे ती सेवा करणे पुष्कळ कठीण असते, तरी तो साधकांना विचारून ती सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’
– श्री. सुनील निनावे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२१)
घरची परिस्थिती साधारण असतांनाही स्वत:च्या दोन्ही मुलांना आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठवणारे वडूज (तालुका खटाव, जिल्हा सातारा) येथील श्री. रमेश गोडसे आणि सौ. अनिता गोडसे !
‘घरची परिस्थिती साधारण असतांनाही तो आणि त्याचा भाऊ (श्री. दीपक गोडसे (वय २२ वर्षे)) दोघेही पूर्णवेळ साधना करण्यासाठी सनातनच्या आश्रमात आले. त्यांचे आई-वडील (सौ. अनिता गोडसे आणि श्री. रमेश गोडसे) मजुरी आणि शेती करून स्वतःचा चरितार्थ चालवतात. ‘अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात पाठवले’, याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.’
– श्री. सुनील निनावे, सनातन आश्रम, गोवा. (२१.६.२०२१)