दलित आणि मुसलमान यांचे राज्य !

संपादकीय

हिंदूंमध्ये फूट पाडून भारतावर राज्य करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

गुफरान नूर

एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशातील अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी एका कोपरासभेमध्ये ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर देशावर राज्य करतील’, असे म्हटले आहे. यापूर्वीच त्यांनी ‘मुसलमानांनी अधिकाधिक मुले जन्माला घालावीत जेणेकरून मुसलमानांची लोकसंख्या वाढली, तर पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पंतप्रधान होऊ शकतील’, असे विधान केले होते. अशा प्रकारचे स्वप्न पहाणार्‍यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच प्रकारच्या दुर्लक्षामुळे भारताची फाळणी झाली. त्या वेळी केवळ हिंदु आणि मुसलमान असाच भाग होता. आता हिंदूंमधील दलितांना वेगळे करून त्यांना आपल्यासमवेत घेण्याचा डाव धर्मांधांनी रचला आहे. त्याला काही दलितांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे महाराष्ट्रातील वंचित आघाडीसारख्या प्रयोगातून लक्षात येत आहे. येथे एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला हवी की, धर्मांधांच्या लेखी दलित हेही हिंदूच म्हणजे मूर्तीपूजक आणि काफीर आहेत. ते आज जरी ‘दलित-मुसलमान भाई भाई’ अशा घोषणा देत असले, तरी उद्या ते याच्या उलट वागतील, याला त्यांचा इतिहासच साक्ष आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्माचा त्याग करतांना इस्लाम ऐवजी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ‘मुसलमान दलितांना न्याय देतील’, असे त्यांना कदापि वाटत नव्हते. त्यांनी म्हटले होते, ‘ज्याप्रमाणे हिंदूंमध्ये जातीवाद आहे, तसाच जातीयवाद मुसलमानांमध्येही आहे.’ यातूनच सर्व काही स्पष्ट होते. केवळ मुसलमानांमध्येच नाही, तर ख्रिस्त्यांमध्येही जातीयवाद आहे. ख्रिस्ती हे धर्मांतरित झालेल्या दलित हिंदूंना ‘खालच्या जातीचे’ म्हणूनच पहात असतात. त्यामुळे हिंदूंमध्ये फूट पाडून आपला स्वार्थ साधण्याचा धर्मांधांकडून नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

डॉ. आंबेडकर यांनी इस्लाम पंथ स्वीकारला नाही !

‘देशात मुसलमानांची लोकसंख्या सध्या २० कोटी असल्याचे सांगितले जाते, त्यात आणखी १० ते १५ कोटींची भर पाडली की, हा देश इस्लामी देश करण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकणार नाही’, असेच अभ्यासक सांगत आहेत. हिंदूंच्या निद्रिस्तपणामुळे भारत इस्लामी देश होण्याचे नाकारता येणार नाही. काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य होते आणि त्यांनी तेथे अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर आक्रमण करून त्यांना हाकलून लावले. आज काश्मीर भारतीय सैन्यामुळे भारताच्या कह्यात आहे, अन्यथा तो पाकिस्तानचा भाग होण्यास वेळ लागणार नाही. हा इतिहास भारताचे इस्लामी देशात रूपांतर होण्याच्या शक्यतेची साक्ष देत आहे. मोहनदास गांधी यांनी हिंदु आणि मुसलमान यांचे ऐक्य करण्याचे अनेक प्रयत्न केले; मात्र ते शक्य झाले नाही. यातून भारताची फाळणी झाली, १० लाख हिंदूंच्या हत्या फाळणीच्या वेळी झाल्या, तर तत्पूर्वी केरळमध्ये मोपला मुसलमानांकडूनही हिंदूंच्या हत्या झाल्या. मुळात हे ऐक्य म्हणजे शुद्ध मूर्खपणाचा विचार होता. दोन भिन्न विचारांचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा समाज कधीही एकत्र येऊ शकणार नाही. त्यातही एक पंथ आक्रमणकारी आणि भारताबाहेरचा, तर एक धर्म भारताचा मूळ आणि शांतताप्रिय असलेला. त्यांच्यात मतैक्य कदापि होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे होते; मात्र हटवादी धोरणामुळे गांधी यांनी तो प्रयत्न केला आणि त्याची फळे भारत आजही भोगत आहे आणि पुढेही अशीच स्थिती राहिली, तर भोगत रहावे लागणार आहे. फाळणी होऊनही गांधी यांच्यामुळेच मुसलमान भारतात राहिले. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता. ‘जर धर्माच्या आधारे देशाची फाळणी होत आहे, तर धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदली झाली पाहिजे. पाकमधील सर्व हिंदू भारतात आणि भारतातील सर्व मुसलमान पाकमध्ये जायला हवेत’, असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते; मात्र गांधी यांच्यापुढे कुणाचेच शहापण चालत नसल्याने असे झाले नाही. पुढे आंबेडकर यांनी हिंदु धर्माचा त्याग करतांना बौद्ध धर्म स्वीकारला. डॉ. आंबेडकर यांनी जे सांगितले, त्या विचारांवर भारतातील दलित वागतील, अशीच अपेक्षा करायला हवी.

राष्ट्रवादी दलित भीक घालणार नाहीत !

दलितांमधील काही राजकारणी केवळ हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी धर्मांधांची संगत करत आहेत. जो एकप्रकारचा ‘आत्मघात’ आहे, असेच म्हणावे लागेल. ‘शत्रूचा शत्रू तो आपल्या मित्र’ या न्यायाने धर्मांध हे दलितांना दाणे टाकत आहेत आणि काही संधीसाधू, स्वार्थी दलित नेते याला बळी पडत आहेत. हे राजकारण आणि हा स्वार्थ दलित जनतेनेही ओळखला पाहिजे. दलितांना सवर्ण हिंदूंकडून अनेक शतके त्रास सहन करावा लागला, हे सत्य आहे. त्यामुळे ‘सवर्ण हिंदूंचा द्वेष करून त्यांना धडा शिकवण्यासाठी कुणी दलित मुसलमान राजकीय पक्षांसमवेत जात असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते पटत असेल का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. डॉ. बाबासाहेब यांनी कधीही हिंदूंना धडा शिकवावा म्हणून मुस्लिम लीगशी जवळीक केली नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे. वंचित आघाडीद्वारे डॉ. बाबासाहेब यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी एम्.आय.एम्.समवेत युती करून हिंदुत्वनिष्ठ पक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला दलित आणि मुसलमान यांनीच त्यांना विशेष साथ दिली नाही, हे मागील निवडणुकीत स्पष्ट झाले. ही एक चांगली घटना घडली. उत्तरप्रदेशात मायावती या स्वतःला दलितांच्या तारणहार समजतात. त्यांनीही मुसलमानांऐवजी राज्यातील ब्राह्मणांना एकत्र करण्याचा प्रयत्न मागे केला होता आणि त्यातून त्यांना सत्ता मिळाली होती, हे येथे लक्षात घ्यायला हवे. दलित आणि मुसलमान यांची युती देशात कदापि सत्तेवर येऊ शकणार नाही, हे वास्तव आहे; कारण दलितांमध्येही राष्ट्रवाद आहे. असे राष्ट्रवादी दलित कदापि अशा युतीचे समर्थन करणार नाहीत. तसेच धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्यातील असंघटितपणाचा अशा प्रकारे कुणी अपलाभ घेत असेल, तर त्याला रोखले पाहिजे. त्यामुळे गुफरान नूर यांच्यासारख्यांना त्यांचा उद्देश साध्य करता येणार नाही. ते केवळ दिवास्वप्नेच पहात रहातील.