राष्ट्रीय महिला आयोगाने जावेद हबीब यांच्यावर कारवाई करावी ! –  श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हबीब यांनी महिलेच्या डोक्यावर थुंकून तिचा अपमान केल्याचे प्रकरण

केशरचनाकार जावेद हबीब

मुंबई, ८ जानेवारी (वार्ता.) – केशरचनाकार जावेद हबीब हे एका कार्यक्रमात व्यासपिठावर एका महिलेच्या केसांमध्ये थुंकले. यावर टीकेची झोड उठल्यानंतर हबीब यांनी क्षमायाचना केली; परंतु केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर अशा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला पाहिजे. त्याचप्रकारे जावेद हबीब यांनी महिलेच्या डोक्यावर थुंकून तिचा अपमान केला असल्याने राष्ट्रीय महिला आयोगाने नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी एका व्हिडिओद्वारे केली.

श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘जावेद हबीब यांच्या केशरचनेच्या सर्व आस्थापनांत अशाच प्रकारे थुंकण्याचे प्रकार होतात का ?, याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे. यापूर्वीही धर्मांधांकडून भोजन, फळे यांवर थुंकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शासनाने हा ‘थूक जिहाद’ आहे का ? याचेही अन्वेषण केले पाहिजे.’’