महिलांची मानहानी आणि धर्म !

संपादकीय

हिंदु महिलांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शासनकर्ते हवेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

देहली येथील प्रतिष्ठित घराण्यातील मुसलमान महिलांची छायाचित्रे त्यांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यातून चोरी करून त्यांमध्ये आक्षेपार्ह पालट करून‘बुल्ली बाई’ या ॲपवर ठेवण्यात आली होती. यात महिलांची किंमत ठरवून त्यांची ‘ऑनलाईन’ विक्री करण्याचा वाईट हेतू होता. ही छायाचित्रे ‘गिटहब’ या ॲपने सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून अवघ्या २ दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ‘या प्रकरणी नेमके सूत्रधार कोण आहेत ?’, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांची ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. मुसलमान महिलांची अपकीर्ती करणार्‍यांचा शोध चालू असतांनाच नाशिक येथील एका हिंदु युवतीवर बलात्कार करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍याला अटक करावी, यासाठी ५ जानेवारी या दिवशी सिन्नर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांना निवेदन देण्यात आले. २८ डिसेंबर २०२१ या दिवशी सिन्नर येथे या युवतीने आत्महत्या केली. मुसलमान महिलांची अपकीर्ती करणार्‍यांचा २ दिवसांत छडा लावणार्‍या पोलिसांनी या बलात्काराच्या प्रकरणात १० दिवसांनंतर गुन्हाही नोंदवलेला नाही. आरोपीला अटक करावी, यासाठी ७ जानेवारी या दिवशी सिन्नरकरांनी भव्य मोर्चा काढला. एका प्रकरणात तत्परतेने कारवाई करणारे आणि दुसर्‍या प्रकरणात गुन्हाही न नोंदवणारे पोलीस महाराष्ट्रातीलच आहेत. भेद मात्र इतकाच आहे की, ‘बुल्ली बाई’ प्रकरणात मुसलमान महिलांची अपकीर्ती झाली होती आणि सिन्नर प्रकरणात हिंदु युवतीची. सिन्नर येथे बलात्कार करणार्‍याचे नाव ‘रईस इब्राहिम शेख’ आहे. त्यामुळे पोलीस गप्प आहेत. ‘बुल्ली बाई’ प्रकणात तत्परतेने कारवाईचा आदेश देणारे गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी याविषयी मात्र तोंडातून चकार शब्दही काढलेला नाही. दोन्ही प्रकरणांत महिलांची अपकीर्ती झाली असतांना एका प्रकरणात तत्परतेने कारवाई होते आणि दुसर्‍या प्रकरणात साधी तक्रारही नोंदवली जात नाही, याचा अर्थ काय होतो ? ‘महिला कोणत्या धर्माची आहे ?’, यावरून पोलीस कारवाई करतात का ? तसे नसेल, तर ‘हा दुजाभाव कशासाठी ?’, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे.

बेगडी धर्मनिरपेक्षता !

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडत असतांना त्याविषयी आतापर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी चौकशी करण्याची मागणी केली नाही. अशा प्रकरणांत अनेकदा पोलीस तक्रारही नोंदवून घेत नाहीत. ‘बुल्ली बाई’ प्रकरणाविषयी सरकारी यंत्रणांनी तत्परतेने पाऊल उचलून मुंबई पोलिसांनी कर्नाटक, उत्तराखंड येथून आरोपींना २ दिवसांत कह्यात घेतले. स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली. ‘बुल्ली बाई’ प्रकरणातील पोलीस, राजकारणी, महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची कार्यतत्परता समाजाने पाहिली; मात्र ही सर्व मंडळी ‘लव्ह जिहाद’विषयी बोलत नाहीत. हिंदु महिलेवर बलात्कार झाल्यावर दुर्लक्ष करायचे आणि मुसलमान महिलांची अपकीर्ती झाल्यावर रान उठवायचे, हीच या देशातील धर्मनिरपेक्षता आहे का ?

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची चौकशी का नाही ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लव्ह जिहादच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेकडो मुलींना धर्मांधांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. २२ फेब्रुवारी २००९ या दिवशीच्या दैनिक ‘तरुण भारत’च्या सोलापूरच्या आवृत्तीमध्ये संभाजीनगर येथे मौलवीकडून ‘लव्ह जिहाद’साठी प्रतिदिन २०० रुपये घ्या आणि हिंदु मुलींना बाटवा’ असा फतवा काढण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हिंदु मुलीला बाटवल्यावर धर्मांधाला दुचाकी आणि हिंदु युवतीशी लग्न केल्यावर २ लाख रुपये देण्यात येत असल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या ‘लव्ह जिहाद’चा धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलीस महासंचालकांना अहवाल सादर करण्यात सांगितले. हा अहवाल केरळ उच्चन्यायालयात सादर करण्यात आल्यावर १७ डिसेंबर २००९ या दिवशी यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती के.टी. शंकरन् म्हणाले की, या अहवालातून केरळमध्ये वर्ष १९९६ पासून प्रेमाच्या नावाखाली धर्मांतर करण्याची चळवळ चालू असल्याचे दिसून येते. या नियोजित धर्मांतराच्या कारवायांमागे ‘इस्लामिक पॉप्युलर फ्रंट’ असल्याचेही त्यांनी नमूद केले. केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंदन् यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना पैसा आणि विवाह यांच्या माध्यमातून २० वर्षांत केरळचे इस्लामीकरण करू पहात असल्याचे म्हटले आहे. याविषयीचे वृत्त २६ जुलै २०१० च्या दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ‘जैन इंटरनॅशनल वुमेन ऑर्गनायझेशन’ या संघटनेच्या साध्वी श्री मयणा श्रीजी यांनी जैन समाजातील २०० हून अधिक युवती लव्ह जिहादला बळी पडून मुसलमान झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातही वर्ष २०११ पर्यंत लव्ह जिहादच्या २२ घटनांची अधिकृत नोंद आहे. प्रत्यक्षात अनेक घटनांची नोंद पोलीस ‘लव्ह जिहाद’ म्हणून करत नाहीत. ‘बुल्ली बाई’ या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणार्‍या खासदार प्रियंका चतुर्वेदी ज्या पक्षाच्या खासदार आहेत, त्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधूनही अनेकदा लव्ह जिहादच्या विरोधात आवाज उठवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘लव्ह जिहाद’चे प्रकार उघड होत असूनही त्याविषयी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय सरकारांनी याविषयी एकदाही चौकशीचा आदेश दिलेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आबाजी सोनदेव यांनी कल्याणचे सुभेदार मुल्ला अहमद यांची सून भेट म्हणून आणली होती. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आबाजीपंतांना सज्जड दम भरला आणि सुभेदाराच्या सूनेची खणा-नारळाने ओटी भरून तिला सन्मानपूर्वक पालखीतून घरी पाठवले. कुठे शत्रूच्या महिलेचाही सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे ‘लव्ह जिहाद’द्वारे शेकडो हिंदु महिलांवर अत्याचार होत असतांना मुसलमानांच्या मतांसाठी गुन्हेगारांवर कारवाई न करणारे आताचे राजकारणी !