हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे मुनावर फारूकी यांचा पुणे येथील कार्यक्रम रहित
हिंदूंनी संघटितपणे धर्मरक्षण केले, तर यश मिळते, हेच यावरून लक्षात येते. या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया ! – संपादक
पुणे, ७ जानेवारी (वार्ता.) – हिंदु देवतांविषयी अतिशय हीन पातळीचे विनोद करणारे, सध्या जामिनावर बाहेर असलेले मुनावर फारूकी यांचा पुणे येथील कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे रहित झाला आहे. यापूर्वीही मुंबईतील काही ठिकाणी, बंगळुरू, तसेच भाग्यनगर येथे असाच विरोध झाल्याने मुनावर फारूकी यांचे कार्यक्रम रहित करण्यात आले होते. पुण्यातही अशाच पद्धतीने ‘धंधो’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची ऑनलाईन तिकीटविक्रीही चालू होती. हे लक्षात आल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना हा कार्यक्रम रहित करण्याविषयी निवेदन दिले होते.
हे निवेदन देतांना भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, धर्मप्रेमी महेंद्र देवी, धीरजनाथ, जयवंत जाधव, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, अधिवक्ता गवारे, अधिवक्ता सीमा साळुंके, अधिवक्ता आदित्य पवार, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले हे सहभागी झाले होते. अशाच प्रकारचे निवेदन पतित पावन संघटनेच्या वतीनेही स्वतंत्रपणे देण्यात आले होते.
असे असले, तरी ‘कोविडच्या कारणांमुळे मी कार्यक्रम रहित करत आहे’, असे सांगत फारूकी याने प्रकरणावर पडदा टाकण्याचा पोकळ प्रयत्न केला.