स्वतःला तीव्र शारीरिक त्रास होत असूनही स्थिर राहून वडिलांची अविरत सेवा करणारे आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया !

आधुनिक वैद्य उज्ज्वल कपाडिया

१. पायाचा त्रास होत असूनही वडिलांची सर्व प्रकारची सेवा करणे

‘उज्ज्वल ६ दिवस घराजवळील एका रुग्णालयात भरती होता. त्याचे पाय आणि फुप्फुस यांच्या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. ‘त्याला ३ मास चारचाकी चालवायची नाही आणि घरातल्या घरातही पुष्कळ चालायचे नाही’, असे सांगितले होते. त्याला विश्रांती घ्यायला सांगितली होती; पण बाबांना ज्या रुग्णालयात भरती केले होते, ते रुग्णालय घरापासून दूर असल्याने त्याला बाबांच्या समवेत रहावे लागले. त्याला पायाचा त्रास असूनही तो बाबांच्या सेवेसाठी सतत वर-खाली करत होता. ‘बाबांना औषधे आणून देणे, अधूनमधून त्यांची स्थिती पहाणे, त्यांना काय हवे, ते देणे, जेवण आणून देणे, त्यांचे कपडे पालटणे आणि धुणे’, असे तो सर्व करत होता. (कोरोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून कपडे मिळत नव्हते.)

२. प्रतिकूल परिस्थिती मनापासून स्वीकारणे

त्याला रात्री झोपण्यासाठी एक खोली मिळाली होती. ती सकाळी ७ वाजता रिकामी करावी लागायची. त्याला दुपारी विश्रांती घेण्यासाठी जागा नव्हती. तो रुग्णालयाच्या आवारात असलेल्या झाडाखाली झोपायचा. तो झाडाखालीच जेवायचा. अशा स्थितीतही तो त्याचे नामजपादी उपायही ठरवलेल्या वेळेत पूर्ण करायचा. त्याने आपत्काळाची एक झलक अनुभवली. त्यात त्याने सर्व परिस्थिती स्वीकारल्याने त्याची साधना झाली.’

– कापडिया कुटुंबीय (८.५.२०२१)