नवी मुंबई – येथील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले आहे. विविध प्रकल्पांच्या पहाणीसाठी नवी मुंबईत आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
नवी मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव करून तो शासनाकडे संमतीसाठी पाठवला होता; मात्र हा ठराव आघाडी सरकारने संमत केला नाही. आता नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने शिंदे यांनी वरील घोषणा केली आहे, अशी चर्चा आहे. याचा लाभ शहरातील १ लाख ९७ सहस्र मालमत्ताधारकांना होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता करमाफी आणि मालमत्ता सवलतीचा ठराव जुलै २०१९ मध्ये संमत केला होता.