नोंदणीकृत भौतिकोपचार तज्ञाविना अन्यांनी उपचार केल्यास कारवाई होणार !

कणकवली – ‘महाराष्ट्र कायदा २००४ (२) नुसार नोंदणीकृत भौतिकोपचार तज्ञाविना (‘फिजिओथेरपीस्ट’विना) इतर कोणतीही व्यक्ती भौतिकोपचारचा (‘फिजिओथेरपी’चा) व्यवसाय करू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या नावाची नोंदणी ‘महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार परिषद, मुंबई’ यांच्याकडे आहे, तीच या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असून अन्य व्यक्तींनी हे उपचार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिषदेने म्हटले आहे, अशी माहिती ‘सिंधुदुर्ग जिल्हा फिजिओथेरपीस्ट संघटने’चे डॉ. राहुल जगताप यांनी दिली.