गुढीपाडव्याला चालू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता चालू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर चालू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.