काँग्रेस नेते रशिद खान यांची पोकळ धमकी !
‘भारतातील जागृत हिंदू भारताला कधीही इस्लामी राष्ट्र बनू देणार नाहीत’, हे धर्मांधांनी कायमचे लक्षात ठेवावे ! केवळ हिंदु राष्ट्रच नव्हे, तर भविष्यात अखंड भारताची स्थापना करण्याच्या दिशेने हिंदू प्रयत्न करणार आहेत, हेही त्यांनी ध्यानात ठेवावे ! – संपादक
भाग्यनगर (तेलंगाणा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल हे सर्वजण हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाहीत. मी जिवंत असेपर्यंत भारताला कधीच हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही, अशी धमकी तेलंगणातील काँग्रेसचे नेते रशिद खान यांनी दिली आहे.‘मुसलमानांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष आहे’, असेही त्यांनी म्हटले. (मुसलमानांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष आहे, यात काहीच शंका नाही. हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्वांत पहिला अडथळा कुणाचा आहे, हेच राशिद यांनी स्पष्ट केले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)
Telangana Congress leader Rashed Khan, who had called for Wasim Rizvi’s murder says he will not allow India to become a Hindu Rashtrahttps://t.co/sr9VxfIKpG
— OpIndia.com (@OpIndia_com) December 28, 2021
रशिद खान यांनी यापूर्वी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि हिंदु धर्म स्वीकारलेल्या जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वश्रमीचे वसीम रिझवी) यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. (अशा प्रकारे ठार मारण्याची धमकी देऊनही काँग्रेसचा नेता अजून मोकाट कसा काय फिरत आहे ? तेलंगाणातील तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार गुंड नेत्यांना पाठीशी घालत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)