कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – जर वर्ष २०२३ मध्ये काँग्रेस सत्तेत आली, तर विधीमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल, यात कोणतीही शंका नसावी, असे हिंदुद्रोही विधान काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. सध्याच्या भाजप सरकारने धर्मांतरविरोधी विधेयक विधानसभेत संमत केले असून आता ते विधान परिषदेत संमतीसाठी मांडण्यात आले आहे.
Karnataka Congress promises to repeal ‘Anti-Conversion Bill’ if voted to power in 2023 https://t.co/OipyuaNfQm
— Republic (@republic) December 27, 2021
सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, मीसुद्धा बलपूर्वक धर्मांतराचा विरोध केला आहे. राज्यघटनेमध्ये बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या विरोधात तरतूद आहे; मग नवीन कायदा करण्याची काय आवश्यकता होती ? सर्व समजूतदार लोकांनी या कायद्याचा विरोध केला पाहिजे. दुसरीकडे असेही पसरवण्यात येत आहे की, बौद्ध, जैन, लिंगायत आणि शीख हे धर्म हिंदु धर्माचेचे भाग आहेत. हा एक धोकादायक प्रयत्न आहे; कारण या धर्मांची स्थापना वैदिक धर्माच्या विरोधात करण्यात आली होती. हे लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (या पंथांची स्थापना हिंदु धर्मातून झाली असल्याने ते हिंदु धर्माचेच भाग आहेत, हे स्पष्ट होते. इतकेच नव्हे, तर १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर इस्लाम नव्हता तेव्हा लोक मूर्तीपूजकच होती, हा इतिहास आहे, तसेच २ सहस्र वर्षांपूर्वी येशूचा जन्म होऊन ख्रिस्ती धर्म स्थापन होण्यापूर्वी जगभरात हिंदु धर्माचे पालन केले जात होते, हे अनेक संशोधनांतून समोर आले असल्याने बौद्ध, जैन आणि शीख यांना हिंदु धर्माचाच भाग म्हणणेच योग्य आहे. तसेच लिंगायत हा हिंदु धर्मातील एक समाज आहे. त्याला हिंदूंपासून वेगळे दाखवण्याचा धोकादायक प्रयत्न हिंदुद्रोह्यांकडून केला जात आहे. याचा हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! – संपादक)