यासाठी उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे ! – संपादक
निमार (मध्यप्रदेश) – खांडवा शहरामधील ‘अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल’च्या प्रश्नपत्रिकेत ‘करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव काय ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावरून टीका झाल्यानंतर शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासमवेतच शालेय शिक्षण विभागाने कारवाई केल्याचे सांगितले आहे.
MP school served notice for asking the name of Saif and Kareena’s son in exam, school defends saying it enhances knowledge of studentshttps://t.co/Qpeb28SwHO
— OpIndia.com (@OpIndia_com) December 25, 2021
अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलने इयत्ता सहावीच्या मुलांना परीक्षेत हा प्रश्न विचारला होता. शाळेच्या या प्रश्नावर पालक शिक्षक संघाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, तर ‘शाळेला प्रश्न विचारायचाच होता, तर महापुरुषांविषयी विचारले असते’, असे म्हटले आहे.