पुणे – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी हे भगवंताशी एकरूप झालेले अतीउच्च संत होते. त्यांच्या पदपस्पर्शाने ‘पिंपरी-चिंचवडनगरी’ ओळखली जाते. मोरया गोसावींचा संजीवन समाधी सोहळा अखंडपणे चालू राहील, असा विश्वास कोल्हापूर करवीरपिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह स्वामी यांनी व्यक्त केला. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे २१ डिसेंबर या दिवशी शंकराचार्य यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
गणेशाची सर्व माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. या वेळी पंडित जसराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संरक्षणदलाचे प्रमुख बिपीन रावत, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.