फ्रान्सकडून ६ मासांसाठी मशीद बंद

मशिदीच्या इमामाकडून दिली जात आहेत कट्टरतावादी भाषणे

गेली अनेक दशके मदरसे आणि मशिदी येथून होणार्‍या जिहादी कारवाया अन् कट्टरतावादी प्रसार पहाता भारताने कधीही असा निर्णय घेण्याचे धाडस केलेले नाही, हे लज्जास्पद ! – संपादक

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी देशातील एका मशिदीला ६ मासांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. या मशिदीच्या इमामाकडून दिली जाणारी कट्टरतावादी धार्मिक भाषणे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

ही मशीद पॅरिसपासून १०० किलोमीटर अंतरावरील बिउवेस शहरामध्ये आहे. या इमामावर आरोप आहे की, तो त्याच्या भाषणांमध्ये सातत्याने ख्रिस्ती आणि ज्यू यांच्या विरोधात गरळओक करतो. समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांच्या विरोधातही लोकांना भडकावतो.