घराणीच्या घराणी उद्ध्वस्त करणारा पितृदोष !

‘१०० पैकी ९९ लोक इच्छा-वासना पाठीमागे ठेवून मृत्यू पावतात. कुठल्याही व्यक्तीच्या जाण्याअगोदर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही. त्यातूनच नंतर पितृदोष निर्माण होतात. अतृप्त आत्मे हे ‘कुठली इच्छा शेष आहे’, ते बोलून दाखवू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत किंवा तसा संकेतही देऊ शकत नाहीत. स्वप्नात येण्याचीही त्यांची पात्रता नसते. ते केवळ छळण्याचे काम करतात. जर घरातील आई-वडील, आजोबा गेले, तर त्यांना मुलाविषयी किंवा पुत्राविषयी जाणीव रहात नाही. ते मुलाला छळतात कि पौत्राला छळतात, हे त्यांना कळत नसते. केवळ त्या घराण्याकडून, विशेषतः कर्त्या मुलाकडून स्वतःच्या इच्छा पूर्ण करवून घेणे इतकेच त्यांना ठाऊक असते. पितृदोषामुळे घराणीच्या घराणी उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.’

(साभार : घराण्यातील दोष, ‘प.पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची गुरुवाणी’, पुष्प १०)