पुणे – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंची वोट बँक सिद्ध केली’, या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वादाच्या भोवर्यात सापडले होते. या विधानाचे समर्थन करतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू जनमत संघटित केले. मावळ्यांना देव, देश आणि धर्म यांसाठी जगायला शिकवले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे, तसेच देशातील सामान्य माणसाची गरज पोटाला अन्न इतकीच मर्यादित नाही, तर त्याला हरिद्वार, केदारनाथ आणि काशी विश्वेश्वर इत्यादी ठिकाणांचे दर्शन घ्यायचे आहे. हिंदुत्वाची वोट बँक ही संत, महंत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोचते. कारण छत्रपतींनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन वोट बँक विकसित केली.’’