मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
नवी देहली – विश्व हिंदु परिषद २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत देशभरात धर्मांतरविरोधी आंदोलन करणार आहे.
धर्मांतरण को लेकर VHP ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि धर्मांतरण की बढ़ती घटनाओं को देखते हुए राज्य और केंद्र सरकार इसे रोकने के लिए कठोर कानून बनाए @AlokKumarLIVE @VHPDigital @bramhprakash7 https://t.co/VVuvyFFPH5
— Zee News (@ZeeNews) December 18, 2021
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात आम्ही यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांची भेट घेतली. आतापर्यंत ३२९ खासदारांना भेट घेतली असून यांत मुसलमान आणि ख्रिस्ती खासदारांचाही समावेश आहे. जर आदिवासी धर्मांतर करत असेल, तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळू नये. यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे. आमीष, भीती आणि फसवणूक यांद्वारे धर्मांतर करणार्यांना या कायद्याद्वारे कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.