‘तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे. वर्ष २०१५ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्पटन’ने केलेल्या एका संशोधनानुसार ‘रेस्पिरेटरी वायरस’पासून (फुप्फुसांमध्ये संक्रमित होणार्या विषाणूंपासून) तांबे वाचवू शकतो. ‘रेस्पिरेटरी वायरस’मध्ये ‘सार्स’ (सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम) आणि ‘मर्स’ (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हे २ विषाणू आढळून येतात. अशा प्रकारचे विषाणू अन्य वस्तूंवर अनेक दिवस जिवंत रहातात; मात्र तांबे यांना त्वरित नष्ट करतो.’ (भारतामध्ये काही दशकांपूर्वीपर्यंत तांब्याच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता; मात्र त्यांची स्वच्छता आणि त्यांचा जडपणा पहाता आता अन्य हलक्या धातूंचा वापर केला जात आहे. ॲल्युमिनियम आदी धातूंमुळे शरिराला अपाय होतो, असेही समोर आले आहे. – संपादक)