कोल्हापूर जिल्ह्यातील कळे गावातील विद्यार्थ्यांकडून ‘एस्.टी.’ चालू करण्यासाठी आंदोलन !

‘एस्.टी.’ चालू करण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते यापेक्षा दुर्दैव ते काय ?- संपादक 

कोल्हापूर, १७ डिसेंबर – गेल्या एक मासापेक्षा अधिक काळ ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांनी केलेल्या काम बंद आंदोलनाचा फटका सामान्यांसमवेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ‘एस्.टी.’ चालू नसल्याने चालत जाणे, खासगी वाहनांचा आधार घेणे, यांसह अन्य मार्ग विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी अवलंबवावे लागत आहेत. तरी विद्यार्थ्यांची ही होरपळ थांबवून परत एकदा ‘एस्.टी.’चालू करण्यासाठी १७ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कळे गावातील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. शेकडो विद्यार्थ्यांनी ‘एस्.टी.’ त्वरित चालू करा, अशा मागण्यांचे फलक घेऊन कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत हे आंदोलन केले. या आंदोलनात गावातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.