आसनसोल (बंगाल) येथे महिलेची छेड काढणार्‍या दोघा पोलिसांना अटक

अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

आसनसोल (बंगाल) – येथे एका महिलेने दोघा पोलिसांनी छेड काढल्याचा आरोप केला आहे. छेडछाडीचा विरोध केला असता या पोलिसांनी तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. या प्रकरणी या दोघा पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे पोलीस वाहतूक विभागात कार्यरत होते.