प्रेमळ, परिस्थिती आनंदाने स्वीकारणार्‍या आणि कृतज्ञताभावात असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे (वय ६३ वर्षे) !

सौ. अलका भागडे

लेखक ः श्री. चेतन परब, डोंबिवली

१. सौ. अलका भागडे नियमितपणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची सारणी लिहितात.

२. भाव

मी त्यांच्या घरी रविवारचा दैनिक ‘सनातन प्रभात’ द्यायला जातो. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर स्मित हास्य असते. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन ते स्वतःच्या डोक्याला टेकवून त्याला नमस्कार करतात. काकू प्रत्येक वस्तूत भगवंताला बघतात, त्याला प्रार्थना करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात.’

लेखिका ः सौ. अनिता संजय जमदाडे

१. काकू देहभान विसरून सेवा करतात.

२. एकदा मी माझ्या यजमानांना काकूंविषयी सांगतांना मला पुष्कळ आनंद होत होता आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी काकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.’

लेखिका ः सौ. नेहाली शिंपी, डोंबिवली

१. प्रेमभाव

अ. ‘काकू घरी आलेल्या व्यक्तींची आपुलकीने विचारपूस करतात. त्या साधकांच्या कुटुंबातील व्यक्तींचीही विचारपूस करतात.

आ. एकदा माझ्या यजमानांनी उपायांसाठी ‘देवतांची चित्रे ठेवायच्या पिशवीला बटण लावता येईल का ?’, असे काकूंना विचारल्यावर त्यांनी लगेच पिशवीला बटण लावून दिले. ‘साधकांना कुठलीही अडचण येऊ नये’, याची त्या काळजी घेतात.

२. स्वीकारण्याची वृत्ती

काकूंच्या घरात अनेक अडचणी आहेत, तरी त्यांच्या तोंडवळ्यावर तसे कधी दिसत नाही. ‘मला या प्रसंगातून देवाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आहे’, असा त्यांचा विचार असतो.

३. सेवेची तळमळ

एकदा आमच्याकडे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (सनातनच्या ७४ व्या संत) वास्तव्याला होत्या. काकूंना त्या दोघींसाठी भाकरी करण्याच्या सेवेला बोलावले होते. त्या वेळी काकूंनी लवकर उठून घरातील सर्व आवरले आणि त्या सकाळीच आमच्याकडे सेवेला आल्या. तेव्हा त्या घरातील प्रत्येक सेवा आश्रमातील सेवा म्हणून करत होत्या. ‘मला केवळ भाकरी करण्यासाठी बोलावले आहे’, असा विचार न करता त्या ‘दिसेल ते कर्तव्य’ या वृत्तीने सेवा करत होत्या.

४. भाव

अ. एकदा त्यांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ‘त्याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद झाला होता. ‘त्यांच्यासाठी कुठली भाजी करूया ? मी भाजी करून आणू का ?’, असे त्या सतत विचारत होत्या.

आ. काकू सनातनची सात्त्विक उत्पादने किंवा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ देण्याच्या निमित्ताने आमच्या घरी यायच्या. एकदा त्या एका नवीन साधिकेला घेऊन माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘‘हे घर आपल्या गुरुदेवांचे आहे.’’ त्यामुळे मला आणि त्या साधिकेलाही आपलेपणा वाटला. त्या प्रत्येक साधकाच्या घराला ‘गुरुदेवांचा आश्रम’, असे म्हणतात आणि त्याच भावाने त्या घरात थांबतात.

इ. त्यांना गुरुदेवांची सतत आठवण येते. त्या सातत्याने गुरुदेव आणि त्यांनी केलेल्या विविध सेवा यांविषयी बोलतात.

५. काकू रामनाथी आश्रमातून आल्यावर त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

अ. काकू रामनाथी आश्रमातून आल्यावर मला भेटण्यासाठी घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसत होता.

आ. त्या रामनाथी आश्रमातील प्रत्येक दिवसाचे वर्णन करून सांगत होत्या. तेव्हा ‘मीही रामनाथी आश्रमात आहे’, असे मला वाटत होते. आश्रमात रहायला मिळाल्यामुळे त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

इ. त्यांना एका संतांचा सत्संग लाभल्याने अत्यंत आनंद झाला होता. त्यांनी त्यांची सर्व परिस्थिती संतांना सांगितल्यावर ‘त्यांचे मन निर्विचार झाले आहे’, असे मला वाटत होते.’

लेखिका ः सौ. प्रेरणा आमकर, डोंबिवली

१. ‘काकू मायेतील विषयांवर बोलत नाहीत. त्या नेहमी साधनेविषयी बोलतात.

२. कर्तेपणा गुरूंना अर्पण करणे : एकदा मी काकूंना म्हणाले, ‘‘काकू, तुम्हाला पाहिल्यावर माझा शिण आणि माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हा गुरुदेवांचा आश्रम आहे आणि त्यांच्यामुळेच होते. मी कुणीही नाही.’’

लेखिका ः श्रीमती वृषाली काकडे, डोंबिवली

‘समाजातील व्यक्तींना गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ व्हावा’, अशी तळमळ : ‘मला गुरुपौर्णिमेनिमित्त काकूंच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या समाजातील व्यक्तींनी अर्पण दिल्यावर काकू त्यांना ‘अर्पणाची पावती दिनदर्शिकेला लावून ठेवा’, असे आवर्जून सांगतात. त्यामुळे ‘त्यांना गुरुपौर्णिमेला येण्याची आठवण राहील’, असा काकूंचा विचार असतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (६.१२.२०१९))